कोळोशी येथील 106 वर्षाचे परशुराम खरात यांचे निधन

 कोळोशी वरची वाडी येथील परशुराम खरात (१०६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. आजूबाजूच्या कमीत कमी १० ते १५ गावातील जंगलातील वाटा त्यांच्या पाया खालच्या होत्या.मात्र एवढी वर्षे जंगलात शेळ्या चरायला नेऊन सुद्धा कधी पायात चप्पल या व्यक्तिने वापरले नाही.तर येता जाताना ते पुढे लागले की शेळ्या एका ओळीत त्यांच्या मागून चालायच्या हि खासियत होती. जंगलातील त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांना दोन मुलगे,पाच मुली, सुना,जावई, नातवंडे पंतवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!