पानेरी भाजीपाला व फळेफुले सहकारी संस्थेतर्फे लवकरच विक्री केंद्रे सुरु करणार

माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती

पानेरी भाजीपाला व फळेफुले उत्पादक खरेदी विक्री सहकारी संस्थेतर्फे लवकरच कणकवलीत विक्री केंद्रे सुरु करून रोजगार देण्याचा प्रयत्न सुरु राहील असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. परशुराम उपरकर यांनी पानेरी भाजीपाला व फळेफुले खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले.
पानेरी भाजीपाला व फळेफुले उत्पादक खरेदी विक्री सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच येथील श्री. भवानी सभागृह, कणकवली येथे संम्पन्न झाली. यावेळी संस्थेचे सचिव श्री. संतोष सावंत, संस्थापक श्री. चंद्रशेखर उपरकर, संचालक श्री. सखाराम सपकाळ,
श्री.दिलीप हिंदळेकर,
श्री.विलास गुढेकर,श्री.दिलीप सावंत, श्री.सुनिल जंगले,श्री. दैवदीप कुलकर्णी,श्री.गुरुनाथ तिरपणकर व इतर सभासद उपस्थित होते.
सदरील सभेमध्ये संस्थेतर्फे कांही ठिकाणी बचतगट व व्यक्तिगत विक्रेते यांना भाजीपाला व फळेफुले विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देणे, गावठी भाजीपाला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजित करणे,गांववार भाजीपाला पीकविणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे वगैरे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सन 2025/26 च्या संस्थेच्या लेखापरीक्षणास व जमा- खर्च, ताळेबंद व नफा तोटा पत्रके स्वीकारून त्यास मंजुरी देण्यात आली.संस्थेच्या घटनेनुसार भाजीपाला, फळे व फुले उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर गोडावून उपलब्ध करून देणे, ग्रास कटर व अन्य सामुग्री पुरविणे, माल खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सहकार्य करणे वगैरे विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत.तसेच भाजीपाला, फळेफुले उत्पादन करणाऱ्या व विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी व महिला बचतगट यांनी अधिक माहितीसाठी पानेरी भाजीपाला व फळेफुले सहकारी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!