रक्षाबंधनाच्या नात्याला आरोग्यसेवेची साथ; टीबी रुग्णाने आरोग्य सेवकाला बांधली राखी

रक्षाबंधन हा केवळ भावा-बहिणीचा सण नसून तो विश्वासाचा आणि संरक्षणाचा सण आहे. याच भावनेचा प्रत्यय आचरा भंडारवाडी आरोग्यवर्धिनी केंद्रात आला. येथील आरोग्यसेवक प्रदीप शेवाळे यांना एका टीबी रुग्ण महिलेने रक्षाबंधन करून त्यांनी टीबी आजारात केलेल्या रुग्णसेवेबद्दल आभार व्यक्त केले.
“तुमची सेवा, आमच्यासाठी आधार तुमचे योगदान, आमच्या आरोग्याचा आधार या भावनेतून या माताभगिनीने आरोग्यसेवकाला राखी बांधली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला.
सध्या ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात जनजागृती सुरू आहे. आचरा केंद्रातील आरोग्य सेवकांचे कार्य या निमित्ताने समोर आले






