शिवडाव तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी श्री.काशिनाथ गावकर यांची निवड

कणकवली : प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील शिवडाव गावची ग्रामसभा आज उत्साहात संपन्न झाली असून या ग्रामसभेमध्ये गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली.यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्री.काशिनाथ गावकर यांची निवड करण्यात आली.गावातील शांतता,सलोखा आणि सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती महत्त्वाची भूमिका बजावत असते.गावातील विविध समस्या व तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.श्री.काशिनाथ गावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.गावातील तंटे सामंजस्याने सोडवून गावात शांतता व एकोपा कायम राखण्यासाठी समिती प्रभावीपणे कार्य करेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रसंगी सलग मागील दोन वर्षे तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषविलेले श्री.आत्माराम उर्फ बंडू लाड यांच्या देखील कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.गावातील तंटे आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय राहिले असून सलग दोन वर्षे तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.
नूतन गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री.काशिनाथ गावकर तसेच सदस्य म्हणून श्री.नितेश नारायण भिसे(सरपंच),सौ.सायली सखाराम तेली(उपसरपंच),श्री.कुणाल पवार (ग्रामपंचायत अधिकारी),श्री.योगेश कुडाळकर(तलाठी),श्री.
राजेश प्रभू (डॉक्टर प्रतिनिधी),श्री.नितीन विश्वनाथ गावकर(ग्रामपंचायत सदस्य),श्री.चंद्रकांत शिरसाट (व्यापारी प्रतिनिधी),श्री.मुकेश पवार(माध्यमिक प्रशाला प्रतिनिधी),श्री.चंद्रकांत मेस्त्री(प्राथमिक प्रशाला प्रतिनिधी),श्री.अजित तांबे(युवक प्रतिनिधी),कु.मिथुन सोनू गावकर (विद्यार्थी प्रतिनिधी),श्री.तावडे (वीज अंमलदार कनेडी),श्री.प्रवीण गावकर (वीज विद्युत प्रतिनिधी),श्री.अभिषेक नाडकर्णी (ग्रामपंचायत सदस्य ),श्री.शरद सावंत(प्रतिष्ठित नागरिक),श्री.ज्ञानदेव शिरसाट(ग्रामस्थ),श्री.गणेश शिवडावकर (ग्रामस्थ),श्री.रामचंद्र खरात (ग्रामस्थ),श्री.गणंजय तेली (ग्रामस्थ ),श्री.आत्माराम लाड (ग्रामस्थ),श्री.काशीराम शिरसाट (सेवानिवृत्त शिक्षक),सौ.सान्वी सुंदर जाधव (महिला प्रतिनिधी) तर श्री.मयूर मंगेश ठाकूर (सचिव )यांची निवड करण्यात आली.






