आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये बरसल्या सुरांच्या सरी

कणकवली:मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मराठी सुगम संगीत स्पर्धा “श्रावणधारा” 2026 या स्पर्धेचे अंतिम फेरी आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले,या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून शिरगाव हायस्कूलचे शिक्षक शमशुद्दीन अत्तार सर त्याचप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,संचालिका मनीषा सावंत मॅडम, आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम परीक्षक म्हणून लाभलेले माधव गावकर सर, प्रफुल्ल रेवणकर सर, त्याचप्रमाणे संदीप पेंडुरकर सर, डॉ.राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन श्री.गणेश घाडीगावकर त्याचप्रमाणे हरकुळ बुद्रुक गावचे पोलीस पाटील संतोष तांबे सर,त्याचप्रमाणे गणेश चव्हाण आदी मान्यवर या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यानंतर आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये सातत्याने इयत्ता दहावीच्या मुलांसाठी मार्गदर्शन करणारे त्यानंतर डिजिटल तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणारे समशुद्दीन अत्तार सर यांचा सेवानिवृत्ती पर कौटुंबिक सत्कार पार पडला तसेच आयडियल इंग्लिश स्कूल आणि आयडियल स्पेशल स्कूल या दोन्ही शाळांसाठी विशेष असं मुलाचे योगदान देणारे श्री.शिरोडकर साहेब आणि सौ.शिरोडकर यांचाही सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचा गोल्डन बॉय आणि प्रशालेचा माजी विद्यार्थी हर्ष नकाशे याच्या सुमधुर गायनाने श्रावणधारा 2026 या अंतिम फेरीची सुरुवात झाली त्यानंतर तीन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली एकापेक्षा एक अशा प्रकारच्या सुमधुर गायनाने सर्वच स्पर्धकांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं आणि आयडियल मध्ये सुरांच्या श्रावण सरी बरसल्या.
जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा श्रावणधारा 2026 या स्पर्धेचा गटनिहाय निकाल खालील प्रमाणे
पहिला गट वय वर्ष 11 ते 14
प्रथम क्रमांक – श्रुती संजय तावडे
द्वितीय क्रमांक – आरोही मनोज मेस्त्री
तृतीय क्रमांक – चैतन्या तुषार पांचाळ
उत्तेजनार्थ प्रथम- अनुष्का विनोद सुतार
उत्तेजनार्थ द्वितीय – गौरेश नागेश तेली.
उत्तेजनार्थ तृतीय – नयना विजय कदम.
दुसरा गट – वर्ष 15 ते 19
प्रथम क्रमांक – मुग्धा विकास साईल.
द्वितीय क्रमांक – प्रांजली महेश कानेटकर.
तृतीय क्रमांक – श्रुती शरद सावंत
उत्तेजनार्थ प्रथम – प्रणाली सुनील सावंत.
उत्तेजनार्थ द्वितीय -सानवी समीर मर्गज
उत्तेजनार्थ तृतीय – खुशी विशाल आंमडोस्कर
गट तिसरा – खुला
प्रथम क्रमांक- विनय प्रदीप वझे
द्वितीय क्रमांक- ओमकार प्रदीप दळवी
तृतीय क्रमांक – कीर्ती संतोष गुरव
उत्तेजनार्थ प्रथम- अनिकेत कृष्णा तांबे.
उत्तेजनार्थ द्वितीय – युगांता उमेश मेस्त्री.
उत्तेजनार्थ तृतीय – विनायक सिद्धू शीलवंत.
विशेष उत्तेजनार्थ
भूषण मेस्त्री
आनंद परब
कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर,आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम,त्याचप्रमाणे परीक्षक माधव गावकर, प्रफुल्ल रेवणकर, हरकुळ बुद्रुक गावंचे पोलीस पाटील संतोष तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. हे संपूर्ण स्पर्धेसाठी स्पर्धकांना हार्मोनियमची साथ श्री.महेश तळगावकर तर तबला साथ अभिषेक सुतार यांनी दिली तर या संपूर्ण स्पर्धेचे ध्वनी संयोजन राजेश गुरव यांनी पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी केले तर या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वैष्णवी मोर्वेकर मॅडम,वासुदेव दळवी सर,स्वरा फोंडेकर मॅडम, नेहा महेंद्रकर मॅडम, रजनी चव्हाण मॅडम,श्रेया कसवणकर मॅडम आदींचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला स्पर्धक त्यांचे शिक्षक पालक तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!