कोळोशी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे यांची निवड

कोळोशी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अर्जुन शिंदे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. त्यांनी यापूर्वी केलेल्या तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजावरती ग्रामसभेने समाधान व्यक्त करून त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकून त्यांची सलग दुसऱ्यांदा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच श्री गुरुनाथ भाऊ आचरेकर ,उपसरपंच अतुल गुरव तसेच ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे ,सदस्य सिद्धार्थ तांबे ,सुचिता पोकळे, सानिया इंदप, अनुजा आचरेकर त्याचप्रमाणे माजी सरपंच रितिका सावंत ,माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम, विकास सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण, सुभाष इंदप या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. या ग्रामसभेकरता मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.






