प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांना नवदुर्गा सन्मान

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला.
प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय असून शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सध्या शैक्षणिक कार्यात गतिमान आहेत याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रातील ही नवदुर्गा समाजाला प्रेरणादायी ठरेल असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सांगितले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. राजश्री साळुंखे यांनी शिक्षण क्षेत्रातील आपला प्रवास कथन केला. शिक्षण, समाजकार्य, प्रशासन व संशोधन या क्षेत्रातील महिलांचा नवरात्रोत्सवानिमित्त होत असलेल्या सन्मान स्त्रियांच्या कार्याला उभारी देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोमनाथ कदम, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे, सौ. सुरेखा भिसे, दयानंद मांगले, दीपिका मेस्त्री ,दयानंद तेली डॉ. गणेश बांदकर, उपाध्यक्ष श्री. राजन भोसले, सौ. रिमा भोसले, दीक्षा तेली, शरयू ठुकरुल पूजा जाधव, बाबाजी गोवेकर, श्रीकृष्ण शिरोडकर, संजय खोत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांना नवदुर्गा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे, सचिव श्री. विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त, सदस्य, तसेच प्राचार्य युवराज महालिंगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





