रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत कणकवली येथे विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय सेवा दिनाच्या औचित्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजन

राष्ट्रीय सेवा दिनाच्या औचित्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली महाविद्यालय, कणकवली येथे रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात परि. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शक सूचना दिल्या. वाहन चालविताना परवाना, हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा व मोबाईल वापर टाळणे याबाबत त्यांनी विशेष भर दिला.

तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक मितेश माने यांनी विद्यार्थ्यांना मोटार वाहन अधिनियमातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती दिली व अपघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा शपथ घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे व अपघातमुक्त समाज घडविण्यास हातभार लावण्याचे वचन दिले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!