मालवणचे उपअभियंता अजित पाटील यांना उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार

सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दिला जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार मालवणच्या अजित पाटील यांना जाहीर झाला आहे. अजित पाटील हे मालवणचे उप अभियंता आहेत त्यांनी मालवणचे उपअभियंता म्हणून खूप चांगल्या पद्धतीने गेली काही वर्ष काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्ष अजित पाटील हे काम करत आहे त्यांच्या या कार्याचा गौरव करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते पूल विविध विभागाच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करणे इमारती पूलांची संकल्पना तयार करून व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही वापर करून संकल्प चित्र बनवताना तसेच सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जी तांत्रिक कौशल्यपणाला लागते आणि ज्यामुळे अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या वैयक्तिक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येते त्या निमित्ताने उल्लेखनी कामगिरी केलेल्या अभियंत्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात येतो सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व तांत्रिक अ तांत्रिक संवर्गातील काही कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे यात मालवणच्या उप अभियंता म्हणून काम करणाऱ्या अजित पाटील यांचा समावेश आहे अजित पाटील हे सर्वांना एकत्र घेऊन काम करत असतात त्यांच्या कामाचा हा गौरव झाला आहे त्यांनी विविध विकास कामांमध्ये आपला ठसा उमटविला आहे त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने विविध स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे





