सदा राणे यांना वायंगणी ग्रामस्थांकडून आदरांजली

लोकांच्या सहकार्या साठी झटणारे ज्ञानदीप संस्था वायंगणीचे माजी अध्यक्ष सदा राणे यांचे सामाजिक कार्य आदर्शवत होते असे उदगार ॲड समृद्धी आसोलकर यांनी वायंगणी येथे व्यक्त केले.
वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष सदानंद राणे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानिमित्त
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय आणि ग्रामस्थांतर्फे वायंगणी हायस्कूल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत
हनुमंत प्रभू, दिपक सुर्वे, बाबू हडकर, वैभव जोशी, मनोहर वायंगणकर, सुरेश सावंत, संतोष वायंगणकर, दिपक सावंत, विलास सावंत, उदय दुखंडे, अशोक सावंत, सुशांत आसोलकर, शंकर उर्फ बाळू वस्त, सुंदर सावंत, मुख्याध्यापक टकले सर, शिक्षक यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!