भाजपा कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्याकडून खारेपाटण प्रा. आ. केंद्रात फॅन, टाकेवाडी येथे सोलार लाईट प्रदान

भाजपा चे कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथील टाकेवाडी येथे चार सोलार लाईट तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फॅन नुकताच सुपूर्त केला. त्याच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी देखील दिलीप तळेकर यांचे आभार मानले.





