कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम दुड्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर

कणकवली, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक व वैभववाडी नापणे येथील काचेचा पूल बनवण्यामध्ये मोठे योगदान
कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुड्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न सर विश्वेश्वरया याांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस हा दरवर्षी अभियंता दीन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रधान करण्यात येते. तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मधील कणकवली विभागातील वैभववाडी कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुड्ये यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
2024 व 2025 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तत्कालीन कार्यकारी अभियंता विजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विभागातील कणकवली रेल्वे स्थानक व वैभववाडी नापणे येथील काचेचा ब्रिज उभारण्यात साठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या शुभम दुड्ये यांना हा पुरस्कार मिळाल्याने कणकवली विभागातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .
कणकवली विभागा उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांच्या सोबत नेहमी कार्यतत्पर असणारे शुभम दुडे यांनी करूळ गगनबावडा घाटामध्ये दगडांवर प्राण्यांची चित्रे काढून पर्यटकांना आपण पर्यटन जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याचे समजून येत होते . तसेच कणकवली रेल्वे स्थानक परिसरात नूतनीकरण काम कमी वेळेत दर्जेदार पद्धतीने करून घेण्याची कसब या कनिष्ठ अभियंता दुड्ये यांनी दाखवली तसेच सिंधुदुर्ग नगरी स्थानक परिसरातील सुशोभीकरण कामांमध्ये देखील त्यांनी खूप मेहनत घेतली होती तसेच रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती, पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचा उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्यामुळेच कनिष्ठ अभियंता शुभम दुड्ये यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.





