राजेंद्र चिके व श्रीकृष्ण ढेकणे, खारेपाटण यांजकडून खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET अभ्यासक्रमाची रु.२५०००/-किमतीची पुस्तके वर्ग वाचनालयासाठी भेट

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि CET या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारच्या पुस्तकांची नेहमीच आवश्यकता असते. परंतु काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे अशी महागडी पुस्तके विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला जाण्याची शक्यता निर्माण होते. ही गरज ओळखून खारेपाटण मधील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण प्रेमी श्री. श्रीकृष्ण ढेकणे व श्री. राजेंद्र ढेकणे, खारेपाटण यांचेकडून रुपये २५०००/- किमतीची NEET, JEE आणि CET या अभ्यासक्रमाची पुस्तके प्रशालेला भेट स्वरूपात देण्यात आली. प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री. हरयाण सर यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली. श्री. राजेंद्र चिके व श्री. श्रीकृष्ण ढेकणे यांचेकडून ही पुस्तके प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमासाठी एसटी विभागात कार्यरत असणारे श्री संतोष पाटील हेही उपस्थित होते.श्री. राजेंद्र चिके व श्री. श्रीकृष्ण ढेकणे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशालेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री.भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत व सर्व शिक्षक वृंद यांजकडून मान्यवरांचे आभार मानण्यात आले.





