कलमठ सुपुत्र पराग उकर्डे यांची मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदी बढती

गावातील मित्र परिवाराच्या वतीने केला सत्कार

कलमठ गावचे सुपुत्र पराग उकर्डे पोलिस निरीक्षक पदी बढती झाल्यानंतर पहिल्यांदाच कलमठ गावात आले त्यांचा आज सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असताना पोलिस निरीक्षक पदी बढती होऊन कलमठ गावात आले असता आज मित्रपरिवाराने स्वागत करत सत्कार केला. कलमठ सुपुत्र असलेले पराग उकर्डे हे कलमठ कोष्टेवाडी रहिवासी आहेत. संपूर्ण शिक्षण कणकवली मध्ये झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई पोलीस खात्यात त्यांनी यशस्वी काम केले असून पोलिस निरीक्षक पदी बढती झाल्याने कलमठ गावात त्यांचे कौतुक आणि अभिनंद होत आहे. आज मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, महेश लाड, श्रीकांत बुचडे, नितीन पवार, अनुप वारंग, सचिन खोचरे, बाबू नारकर, आबा कोरगावकर,महेश मेस्त्री, कृष्णा कांबळी,संतोष रेवंडकर, समर्थ कोरगावकर,प्रवीण सावंत,मनोज घाडीगावकर, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, पराग यांच्या आई आणि परिवार उपस्थित होते.

error: Content is protected !!