जानवली ग्रामस्थांकडून झाड पडल्याने अडकून पडलेली एसटी मार्गस्थ

रस्त्यावर पडलेले झाड जानवली सखलवाडी ग्रामस्थांनी सकाळीच हटवले

कणकवली हून जानवली मार्गे साकेडी कडे जाणारी सकाळी 6 वाजता ची एसटी रस्त्यावर झाड आडवे पडल्याने बराच वेळ जानवली सखलवाडी या ठिकाणी थांबून होती. या घटनेमुळे एसटी मधील प्रवासी तसेच या एसटी द्वारे शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी यांचे हाल झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच जानवली सखलवाडी मधील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी गाव घेत शासकीय सोपस्करांची वाट न पाहता सकाळीच लगेच रस्त्यावर आडवे आलेले झाड हटवले व एसटी मार्गस्थ केली. यामुळे जानवली सखलवाडी ग्रामस्थांच्या या भूमिकेबद्दल सर्वांनीच आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!