जगद्गुरु संत नरेंद्राचार्य महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करा!

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जगद्‌गुरु संत नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजजागृतीचे कार्य अविरत सुरू असून महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्रालाही याचा अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,
गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे व समर्पित प्रयत्नांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांनी दोन पिढ्यांना धार्मिक प्रेरणा देऊन, समाजात नैतिक मूल्यांची जपणूक केली आहे.
महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तसेच लोककल्याणासाठी त्यांनी केलेली कार्य अत्यंत अनन्यसाधारण आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या आध्यात्मिक साधनेसाठी व समाजसेवेसाठी त्यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करणे हे निश्चितच गौरवाचे ठरेल.
म्हणूनच आपण आपल्या राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला प्रतिष्ठित “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” जगद्गुरु संत श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांना प्रदान करून त्यांना गौरविण्याची कृपा करावी, अशी मागणी श्री राणे यांनी केली आहे.

error: Content is protected !!