जि. प. प्राथमिक शाळा वायंगणी येथे भाकरी डे संपन्न

वा्यंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री स्वप्नील सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत काल “भाकरी – डे ” उत्साहात संपन्न झाला.
“भाकरी – डे या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी छान व सुंदर अशा भाकऱ्या बनवून प्रत्यक्ष उपक्रमात सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत राबविलेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
“शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व कौशल्य पूर्ण ज्ञान देण्याचे व आपल्या स्वतःच्या कुटुंबात आईला स्वयंपाकात मदत करण्याच्या दृष्टीने आनंददायी शनिवार च्या निमित्ताने “भाकरी – डे ” शाळेत राबविण्यात आल्याचे समजते.





