खारेपाटण हायस्कूलमध्ये हापकीडो मार्शल आर्ट चे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. श्री. राज वागदकर यांच्या उपस्थितीत हापकिडो मार्शल आर्ट चे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
समाजातील वाढत्या अत्याचारांवर मात करण्यासाठी प्रशालेतील मुलगे आणि विशेषत: मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या दृष्टीने विविध सहज व सोप्या पद्धतींचा मार्शल आर्ट चा वापर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून या शिबिरामध्ये शिकवण्यात आला. हापकिडो ही एक व्यापक मार्शल आ र्ट आहे, ज्यात हाताचे वार करण्यासोबतच इतरही अनेक तंत्रांचा वापर केला जातो,
हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर करते. या कार्यक्रमासाठी दक्षिण आशिया टेकय्यानं महासंघाचे महासचिव एड. श्री.राज वागदकर उपस्थित होते.
श्री.राज वागदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे सचिव श्री. महेश कोठुरकर सर्व विश्वस्त प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.





