खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे भाकरी डे संपन्न

खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत आज “भाकरी – डे ” उस्ताहात साजरा करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून ओळख असणाऱ्या खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं. प्रत्येक शनिवारी आनंददायी उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबवित असते. “भाकरी – डे या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष करून विद्यार्थींनीचायामध्ये मोठा सहभाग होता. तर शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी छान व सुंदर अशा भाकऱ्या बनवून प्रत्यक्ष उपक्रमात सहभाग घेतला.
शाळेच्या शिक्षिका श्रीम. अलका मोरे, शीतल राठोड, आरती जोजेन, समीक्षा राऊत, श्रीम. चव्हाण मॅडम, श्रीम. अबिदा काझी मॅडम, पदवीधर शिक्षक श्री. मिलिंद सरकटे आदी शालेय शिक्षकांचे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत राबविलेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
“शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व कौशल्य पूर्ण ज्ञान देण्याचे व आपल्या स्वतःच्या कुटुंबात आईला स्वयंपाकात मदत करण्याच्या दृष्टीने आनंददायी शनिवार च्या निमित्ताने “भाकरी – डे ” शाळेत राबविण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप श्रावणकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!