चेंदवण बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करा – आम. निलेश राणे

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी
कुडाळ : तालुक्यात चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवण खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवण ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार आमदार निलेश राणे पतन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या बंधाऱ्याच्या जागेची कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली. लवकरची याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी, शिवसेना तालूकाप्रमुख विनायक राणे, चेंदवन माजी सरपंच देवेंद्र नाईक, संदेश सुकळवाडकर यांच्यासह चेंदवन ग्रामस्थ उपस्थित होते.





