खारेपाटण येथील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

खारेपाटण येथील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दी.१७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे चेअरमन श्री नसीरभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली शेठ न म विद्यालय खारेपाटण च्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झाली.यावेळी विविध गुणवंत कर्मचारी संचालक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सभेला संस्थेचे व्हाईस
चेअरमन श्री राजेंद्र ब्रम्हदंडे,संस्थेचे संचालक श्री प्रवीण लोकरे,श्री संतोष पाटणकर,सौ श्रध्दा विजय देसाई,श्री संतोष हरयाण,श्री विजय कुडतरकर,श्री परवेज पटेल,श्री नंदकिशोर कोरगावकर,श्री राजेश वारंगे,श्री राजेंद्र वरूणकर,सौ मनस्वी कोळसुलकर,श्री भावेश कर्ले
संकेत शेट्ये,व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यालक्षी संचालक श्री शुभम मोरे,खारेपाटण प्रधान कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक श्री गणेश जामसंडेकर, प्कणकवली शाखेचे अधिकारी श्री विजय बागवे आदी उपस्थित होते.तर या सभेला विशेष उपस्थिती मध्ये खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार,सचिव श्री अतुल कर्ले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थितं होते.
प्रारंभी अध्यक्ष श्री नसीर काझी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून आणि प.पू.भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरवात करण्यात आली. तर सन २०२५ – २६ हे वर्ष केंद्रसरकराने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केल्यामुळे संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना सहकाराचे प्रतीक असलेल्या पंचरंगी शाल,बॅच व नोट पॅड इत्यादी साहित्य देऊन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम मोरे यांनी सहकार प्रशिक्षण तथा मार्गदर्शन दिले.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री राजेंद्र ब्रम्हदंडे यांचा त्यांच्या पत्नीचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल शाल,श्रीफळ सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.तर संस्थेचे सर्वांनिवृत्त कर्मचारी श्री सत्यवान खांडेकर यांचा देखील संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.तसेच संस्थेचे नवनिर्वाचित स्वीकृत तज्ञ संचालक श्री संकेत शेट्ये यांचा देखील संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याबरोबरच पतसंस्थेच्या कणकवली शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री विजय बागवे यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन अध्यक्ष नसीर काझी यांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संचालक श्री नंदकिशोर कोरगावकर यांची जिल्हा फेडरेशन संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
“संस्थेच्या आर्थिक वर्षात संस्थेने प्रगती करत नवीन शाखा निर्माण करून व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले असून संस्थेचे सर्व सभासद कर्जदार व ठेवीदार यांचा यामध्ये मोलाचा वाटा असल्याचे भावपूर्ण उदगार संस्था अध्यक्ष श्री नासिर काझी यांनी सर्वसाधारण सभेत सभासदन मार्गदर्शन करताना काढले.
संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम मोरे यांनी वार्षिक सभेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले.या वार्षिक सर्वाधारण सभेच्या चर्चेत संस्था सभासद श्री इस्माईल मुकादम,सुरेंद्र कोरगावकर,अनंत गांधी,प्रकाश मोहीरे,भाऊ राणे, विजय कळंत्रे यांनी चर्चेत सहभाग घेतला.या सभेला मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.





