आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये बरसल्या सुरांच्या सरी.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा श्रावणधारा या स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या दिमाखात नुकतीच पार पडली. जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री.माधव गावकर यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला
यानंतर तीन गटांमध्ये पार पडलेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत सुरांच्या सरींचा वर्षाव स्पर्धकांकडून झाला. या कार्यक्रमांमध्ये हरकुळ बुद्रुक गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून कर्तव्य तत्परतेने आपली सेवा बजावणारे श्री.दीपक तेंडुलकर यांची विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला, तर शिवडाव गावचे सुपुत्र आणि कोकण नाऊ मार्केटिंग एक्झिकेटिव्ह श्री. मयूर ठाकूर यांची राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन जिल्हा समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
श्रावणधारा २०२५
अंतिम फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे
गट ५वी ते ८वी
प्रथम क्रमांक – तनुश्री निलेश मराठे
द्वितीय क्रमांक – आरोही मनोज मेस्त्री .
तृतीय क्रमांक – मैत्री मंदार कुंटे.
उत्तेजनार्थ
प्रथम – श्रुती संजय तावडे
द्वितीय – वेदा प्रवीण मराठे
तृतीय – ओम मेस्त्री
गट क्रमांक 2- ९वी ते 12वी
प्रथम क्रमांक -पूर्वा धोंडी मेस्त्री
द्वितीय क्रमांक – वल्लरी निलेश राणे
तृतीय क्रमांक – प्रांजली कानेटकर
उत्तेजनार्थ
प्रथम – प्रणाली सुनील सावंत.
द्वितीय – शंकर राजाराम सावंत.
तृतीय – कुणाल कृष्णा परब.
गट क्रमांक 3- खुला गट
प्रथम क्रमांक – विनय वझे
द्वितीय क्रमांक – नारायण नाडकर्णी
तृतीय क्रमांक – पूर्वा धाकोरकर
उत्तेजनार्थ
प्रथम – कीर्ती गुरव
द्वितीय – आकांक्षा राणे.
तृतीय – सानिका सासोलकर
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उद्घाटक श्री.माधव गावकर तसेच ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,संचालिका सौ.मनीषा मोहन सावंत मॅडम,संचालिका सौ. गौसिया बुलंद पटेल मॅडम,सल्लागार श्री.डी.पी तानावडे सर, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई तसेच डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुकचे चेअरमन श्री.गणेश घाडीगावकर, सचिव श्री.रमाकांत तेली, सहसचिव श्री.गणेश पारकर तसेच श्री.भूषण वाडेकर, श्री. गणेश चव्हाण, श्री.संदेश घाडीगावकर तसेच परीक्षक श्री. शाम तेंडुलकर आणि श्री. विश्वास प्रभुदेसाई तसेच श्री जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या गायन स्पर्धेसाठी वादन साथ श्री.महेश तळगावकर व श्री.अभिषेक सुतार यांनी दिली तर सूत्रसंचालन श्री हेमंत पाटकर यांनी केले व आभार डी.पी तानावडे सर यांनी मानले.





