“व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा बहरेल जीवन “

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने “अंमली पदार्थ विरोधी” जनजागृती अभियान संपन्न

“व्यसन म्हणजे जिवंत मरण,त्यामुळे व्यसन सोडा आणि आपले जीवन सुधारा “असा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक कु.नयोमी साटम यांच्या आदेशान्वये खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार श्री. मिलिंद देसाई यांनी नुकताच खारेपाटण एस टी बस स्थानक येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान उपक्रम राबविला.
खारेपाटण येथे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सतीश गुरव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानिमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रसिद्धी पत्रके उपस्थित नागरिकांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री. संकेत शेट्ये, श्री. संतोष पाटणकर, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, श्री. सूर्यकांत भालेकर, माजी सरपंच किशोर माळवदे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. शेखर शिंदे, श्री. रामा पांचाळ, गणेश कारेकर, सचिन भालेकर यांसह खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी श्री. पराग मोहिते, श्री. अवधूत गुनिजन, श्री. उद्देश कदम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१३ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधी मध्ये अंमली पदार्थाचे धोके व दुष्परिणाम मोहीम राबविण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान घेण्यात येत असल्याचे खारेपाटण पोलिस दूर क्षेत्राचे पोलिस अंमलदार श्री. मिलिंद देसाई यांनी यावेळी सांगितले. तर या अभियानात आपण सर्वांनी सहभाग घेऊन आपला जिल्हा नाशमुक्त करूया असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

error: Content is protected !!