रणझुंजार’ नेरूर तर्फे १६ ला दहीहंडी स्पर्धा

सुदृढ बैल प्रदर्शन मुख्य आकर्षण
रणझुंजार मित्र मंडळ आयोजित उद्योजक रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमातून दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा नेरूर येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुदृढ बैल प्रदर्शन.
या स्पर्धेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५.०० वाजताची आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 15000 व यशस्वी सलामी देणाऱ्या संघास रोख रक्कम 2000 रुपये देण्यात येतील. तरी इच्छुक स्पर्धकांनी 9370983003 या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ व रुपेश पावसकर यांनी केले आहे.
 
	




