भाजप महिला मोर्चाच्या ‘मंगळागौर’ ला उत्तम प्रतिसाद

अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांचा सत्कार
 भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित ‘चला मंगळागौर कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ.श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, राज्य परिषद सदस्य सौ.संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर मंडल अध्यक्षा सौ आरती पाटील, सौ.सुप्रिया वालावलकर, सरचिटणीस सौ.अदिती सावंत , शहर अध्यक्ष सौ.मुक्ती परब, माजी नगराध्यक्ष सौ.आफ्रीन करोल, सौ.अक्षता खटावकर, नगरसेविका ज्योती जळवी उपस्थित होत्या. भारतमाता प्रतिमा पूजन आणि दिप प्रज्वलननाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्राप्त सौ.श्रद्धा खानोलकर यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश निमंत्रित सदस्य बंड्या सावंत, रुपेश कानडे , पप्या तवटे या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
निम़त्रित फुगडी संघांनी फुगडी सादर केली. त्याचप्रमाणे भाजपा पदाधिकारी यांनी पण फुगडी आणि योगासन नृत्य सादर केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ.साधना माड्ये, माजी सभापती सौ.शिल्पा घुर्ये, उपाध्यक्ष सौ. रेखा काणेकर , मंडल चिटणीस सौ प्रज्ञा राणे, माजी नगरसेविका साक्षी सावंत, माजी शहराध्यक्ष ममता धुरी, शहर उपाध्यक्ष विशाखा कुलकर्णी, सौ. तेजस्विनी वैद्य सरचिटणीस सौ.अक्षता कुडाळकर, सौ. भारती मठकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.रिया नाईक, सौ.माधवी कानडे आदी भाजपा कुडाळच्या सर्वच महिला पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ता यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हळदी कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
	




