आचरा पिरावाडी येथे हजारो दिव्यांच्या साथीने झाले हनुमान चालीसा पठण

आचरा-अर्जुन बापर्डेकर
श्रावण महिन्यातील दर शनिवारी श्री तरुणसंघ दक्षिणवाडा व हनुमान मंदिर न्यास पिरावाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर दक्षिणवाडा येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमाची सांगता मंगलदिप सोहळ्याने शनिवारी करण्यात आली. सदर सांगता सोहळ्या वेळी हनुमान मंदिर दक्षिणवाडा येथे मंदिरात भक्ताच्या क्लेश परिहारार्थ १३०८ दिवे प्रज्वलीत करण्यात आले. या नेत्रदिपक सोहळ्याला बहुसंख्येने आचरा सह मुंबई गुजरात पुणे गोवा येथील भाविक ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मदिरात हनुमान चालीसी पठण आरती व नैवेदय अर्पण करण्यात आल्यानंतर श्री हनुमान पालखी परिक्रमा संपूर्ण पिरावाडी गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.





