प्रतीक्षा पाटील कणकवली तालुक्यात प्रथम तर विज्ञान शाखेमध्ये सुकन्या संजय राणे प्रथम

यंदाच्या बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 95.95% लागला तालुक्यात कणकवली वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्रतीक्षा संजय पाटील हिने 92.83% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर कणकवली कॉलेजची सुकन्या संजय राणे हिने विज्ञान शाखेत कणकवली तालुक्यात प्रथम तर सामायिक शाखांमधून तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळविला सुकन्या संजय राणे हिला 91.67% गुण मिळाले तर आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वरवडे ची विज्ञान शाखेची दिया जयराम प्रभू देसाई हिने 91.17% गुण मिळवून तालुक्यात वित्तीय क्रमांक मिळविला.
बारावी परीक्षेसाठी कणकवली तालुक्यातून 1820 विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते त्यातील 820 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस बसले त्यापैकी 1732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण मध्ये मुलांची टक्केवारी 94.46 तर मुलींची टक्केवारी 97.71 इतकी राहिली आहे.





