आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१०५ रुग्णांनी घेतला लाभ
आचरा–अर्जुन बापर्डेकर
क्रांती दिनाच्या औचित्यावर आणि आचरा गावचे सुपुत्र राजन आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी शाखा आचरे, नॅब नेत्र रुग्णालयात देवगड डॉ. आठवले यांच्या सहकार्याने रामेश्वर हेल्थ क्लिनिक आचरा येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात आचरा परीसरातील एकूण १०५रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, राजन आचरेकर, सौ. सपना आचरेकर, डॉ. वैभव गावकर, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, प्रसाद गावकर, पुनाजी आचरेकर, लक्ष्मण बापर्डेकर, डॉ. दशरथ हाके, लोकमान्य मल्टी पर्पजचे विजय मिराशी, श्रीमती अक्षता नागवेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!