न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेमध्ये क्रांती दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न

बारावी कॉमर्स, आठवी अ यांनी प्रथम क्रमांक मिळविला
आचरा-अर्जुन बापर्डेकर
घी आचरा पीपल असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेमध्ये 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी या दोन गटांमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गीतगायन स्पर्धेमध्ये बारा संघ सहभागी झाले होते .या स्पर्धेत गट क्रमांक एक मध्ये
प्रथम क्रमांक इयत्ता आठवी (अ )
द्वितीय क्रमांक इयत्ता आठवी ( ब )
तृतीय क्रमांक इयत्ता पाचवी
तर गट क्रमांक दोन मध्ये प्रथम क्रमांक इयत्ता बारावी कॉमर्स
द्वितीय क्रमांक इयत्ता दहावी (ब)
तृतीय क्रमांक इयत्ता बारावी कला यांनी मिळविला.
या गीतगायन स्पर्धेचे परीक्षण पारिपत्ये सर, सौ .कदम मॅडम, राजम सर व सौ. गोसावी मॅडम यांनी केले. गीतगायन स्पर्धेसाठी संगीत साथ प्रशालेचे लिपिक अनिरुद्ध आचरेकर आणि कमलाकर पाटकर यांनी दिली. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गीतगायन स्पर्धा उपमुख्याध्यापिका सौ. मधुरा माणगांवकर यांच्या उत्कृष्ट नियोजनातून संपन्न झाली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रावले सर यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे महत्त्व सांगितले. क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी काढली होती.
या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेसाठी शाळा समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर यांनी उपस्थिती दर्शवित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव घुटुकडे ,उपमुख्याध्यापिका सौ. माणगांवकर शिक्षक प्रतिनिधी महाभोज सर व इतर सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सद्गुरु साटेलकर यांनी केले.





