डामरेत राहते घर जळून खाक ; पावणे दोन लाखांचे नुकसान

महसूल विभागाकडून घटनास्थळी पहाणी
कणकवली तालुक्यातील डामरे (वरवचिवाडी) येथील श्री. भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट ने आग लागून घरातील सर्व साहित्य फ्रीज, कपाट, टीव्ही सर्वे कपडे, लाईट फिटिंग, घरातील सर्व धान्य, घरातील भांडी जळून खाक झाले असून अंदाजे 1,85,000/- चे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घहटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली आहे.





