कणकवली शहरातील समीर साई यांचे निधन

क्रिकेटच्या स्पर्धा सह अन्य सामाजिक उपक्रमांना नेहमी च असे सहकार्याचा हात

कणकवली शहरातील-पटकीदेवी फातिमा चाळ येथील रहिवासी व मायनिंग व्यावसायिक समीर अब्दूल साई (४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी निधन झाले. समीर साई हे आजारी असल्याने त्यांना गोवा-बांबुळी येथील जीएमसी मध्ये उपचार सुरू असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. समीर हे दारशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मितभाषी व शांत त्यांचा स्वभाव होता. शहरातील मंडळांना क्रिकेट स्पर्धा व विविध उपक्रमांसाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, बहिणी, भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!