कोकण रेल्वे मार्गावर १७ आणि १८ रोजी वीकेंड स्पेशल ट्रेन्स

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पुढील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक ०१५०२/ ०१५०१ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष, ट्रेन क्रमांक ०१५०२ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष रविवारी दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी १६:३० वाजता मडगाव जंक्शनवरून निघेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) मडगाव जंक्शनला पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१५०१ लोकमान्य टिळक (टी) मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष सोमवारी १८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री १२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
हि ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्टेशनवर थांबेल. याची रचना – एकूण २० एलएचबी कोच २ टियर एसी-०१ कोच, ३ टियर एसी-०३ कोच, ३ टियर एसी इकॉनॉमी ०२ कोच. स्लीपर ०८ कोच, जनरल ०४ कोच, एसएलआर ०१, जनरेटर कार-०१. ट्रेन क्रमांक ०१५०२ चे बुकिंग १२/०८/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. वरील गाड्यांच्या थांब्या आणि वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या. प्रवाशांनी कृपया सेवांचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे. .





