स्वातंत्र्यदिन निमित्त बाल शिवाजी इंग्लिश स्कूल च्या वतीने कणकवली तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी कणकवली बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल वतीने तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. कणकवली व नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता, बाल शिवाजी स्कूल कॅम्पस, जानवली येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धेमध्ये कणकवली तालुक्यातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग खुला असून, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक गटात किमान ५ व कमाल १० विद्यार्थ्यांचा समावेश असावा, अशी अट आयोजकांनी घातली आहे. प्रत्येक गटाला ६ मिनिटे सादरीकरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा मूळ हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण करणे तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे. “देशप्रेमाचा जयघोष गाण्यातून व्यक्त करा!” असा या उपक्रमाचा संदेश आहे.
स्पर्धेत विजेत्या गटांना आकर्षक ट्रॉफीज, प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात येणार असून, सहभागी सर्व गटांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी 12 ऑगस्ट २०२५ सकाळी ९:३० वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. हेमंत तवटे – 8261930716
सौ. प्रणाली सावंत – 9820725989