रॉयल ब्रदर्स खारेपाटण आयोजित नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रथम क्रमांक विजेतेपदी चिन्मय कोळसुलकर तर महेश कारेकर ठरले उपविजेता
रॉयल ब्रदर्स खारेपाटण आयोजित भव्य खुल्या नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री सतीश गुरव व श्री किरण गुरव यांनी पुरस्कृत या स्पर्धेत अंतिम विजेता श्री चिन्मय कोळसुळकर ठरला असून त्याला रोख रुपये १०,००१/- व आकर्षक चषक तर उपविजेता ठरलेल्या श्री महेश कारेकर याला रोख रुपये ५००१/- व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
खारेपाटण एस टी बस स्थानक येथे दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विद्युत प्रकाश झोतात संपन्न झालेल्या या नारळ लढविने स्पर्धेचा शुभारंभ सामजिक कार्यकर्ते श्री निखिल गुरव व किरण गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. तर या स्पर्धेला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, शिवसेना शिंदे गट कणकवली तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव, शिवसेना (उबाठा ) कणकवली तालुका प्रमुख महेश कोळसुलकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजापूर तालुका अध्यक्ष जितेंद्र वीखामकर, भारतीय जनता पक्ष कणकवली तालुका चीटणीस श्री. सुधीर कुबल, श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष श्री. मधुकर गुरव, खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री चेतन हुले, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय देसाई, खारेपाटण शिक्षण संस्थेचें उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे तसेच रॉयल ब्रदर्स खारेपाटणचे प्रमुख कार्यकर्ते श्री. तुषार कोळसुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारळ लढविणे या स्पर्धे करीता प्रथा क्रमांकाचे १०,००१ /- रुपये पारितोषिक युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी पुरस्कृत केले होते. तर द्वितीय क्रमांकाचे ५००१ – पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण गुरव यांनी पुरस्कृत केले होते. तर या स्पर्धेचे आकर्षक चषक श्री. तुषार कोळसुकर यांनी दिले होते.
रॉयल ब्रदर्स खारेपाटण आयोजित या नारळ लढविणे स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७५ स्पर्धकानी सहभाग घेतला होता. तर ही स्पर्धा एकूण चार गटांत खेळविण्यात आली होती. या स्पर्धेच्या शुभारंभ व बक्षीस समारंभ कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे रॉयल ब्रदर्स खारेपाटण चे प्रमुख श्री. तुषार कोळसुलकर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. तर या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थित लाभली होती.