भिरवंडे येथील कृषी मेळावा, पाककला स्पर्धेला प्रतिसाद

आपली शेती, माती व संस्कृतीच्या अनुषंगाने आयोजन

भिरवंडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ दापोली संचलित ब – म्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदुतांकडून कृषी मेळावा आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. केंद्रशाळा मिरवंडे नं. १ येथे झालेल्या मेळाव्याला व स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
कृषिदुतांनी आपली शेती, माती आणि संस्कृती यांच्या सन्मानासाठी हा मेळावा होत असल्याचे यावेळी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन, शेतीस उपयुक्त असणारी सर्व वाहने व अवजारे याविषयी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाबाबत माहितीही तृतीय वर्षाच्या या कृषी दुतांनी दिली. मेळाव्याच्यानिमित्ताने रानभाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थ घेवून महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाला कै. राजाराम मराठे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ढोले, कार्यक्रम समन्वयक श्री. चव्हाण, श्री. बगाडे, मिरवंडे जि. प. केंद्रशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ घाडीगावकर, उपशिक्षिका संजना चिंदरकर व निकिता बगळे, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश घाडीगावकर, मंगेश सावंत, सुरेंद्र सावंत, बाळकृष्ण सावंत, प्रसाद सावंत तसेच शेतकरी, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षद मिटके, समर्थ वरुटे, राकेश आसणेकर, विजय नाईक, निखिल अनुसे, प्रसाद पाटील, योगेश हाके, संकेत आरडे, सुचित पाटील, अर्जुन सुर्यवंशी या कृषीदुतांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!