खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब च्या वतीने आयडिल स्टडी ॲप चे वितरण

सुमारे १६८००० रुपये खर्च तर १०६ शालेय विद्यार्थ्याना ॲप चा लाभ

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या इयत्ता दहावी च्या वर्गात शिकणाऱ्या एकूण १०६ विद्यार्थ्याना तर ६ वर्ग शिक्षकाना उपयुक्त असे एकूण ११२ आयडिल स्टडी ॲप चे वितरण नुकतेच रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले.तर सुमारे २ लाख ६८ हजार रुपये एवढा खर्च या स्टडी ॲप साठी करण्यात आला.
“शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने शिकता यावे व त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब खारेपाटण यांनी हा उप्रकम राबविला असून या स्टडी ॲप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणताही विषय अगदी सहजपणे समजणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी स्टडी ॲप वितरण कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.”
या कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत,रोटरी क्लब खारेपाटण चे साचिव श्री अजय गुरसाळे सर,ट्रझरर रोट्रियन श्रीम.सारिका महींद्रे,रोट्रियन सुबोध देसाई,श्रीम प्रियेशा अमृते,श्रीम. शर्मिन काझी,श्री लक्ष्मीकांत हरियान,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य श्रीम.मनाली होनाळे,पालक संघाचे सदस्य श्री ऋषिकेश जाधव आदी मान्यवर तसेच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे
पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शालेय विद्यार्थ्यांची नावीन्यपूर्ण शिक्षणाची गरज ओळखून हे स्टडी ॲप विद्यार्थ्यांना वितरीत केले असून हे ॲप मराठी इंग्लिश व सेमी इंग्लिश अशा तिन्ही माध्यमात उपलब्ध असून विद्यार्थ्यांना हाताळायला सोपे जाणार आहे. तर अशा प्रकारचे आयडिल स्टडी ॲप रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने अजून १७५ शालेय विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार असल्याचा मानस यावेळी रोटरी चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.”
रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली या संस्थेच्या वतीने खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या स्टडी ॲप बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे व सचिव श्री महेश कोळसुलकर यांनी रोटरी क्लब चे आभार व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!