जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवलीनं. 1 शाळेच्या इको क्लबचा पर्यावरण पूरक उपक्रम

चिंदर पाडेकाप येथील धबधबा परिसराची केली स्वच्छता
आचरा-अर्जुन बापर्डेकर
पावसाळा सुरु होताच कोकणातील असंख्य धबधबे प्रवाहित होतात आणि पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. उत्साही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी करतात आणि पर्यायाने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरते आणि संपूर्ण परिसर अस्वच्छ होतो. असाच एक अप्रतिम निसर्ग सौन्दर्याने नटलेला चिंदर पाडेकाप येथील वाघबीळ धबधबा कचरामय झाला होता. आडवली नं. 1 च्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परिसरातील कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला आणि पुन्हा निसर्गाने मोकळा श्वास घेतला. यावेळी पालक प्रतिनिधी विठ्ठल घाडी, रुपेश साटम शाळेतील शिक्षक रामचंद्र कुबल श्रीम. तनुजा तांबे, श्रीम. रागिणी ठाकूर, श्रीम. वेदिका वाघाटे यांसह विद्यार्थी उपस्थित होते. आडवली शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.