खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची प्रवासी संघटनेची मागणी

रेल्वे स्टेशन पाहणी करण्याकरिता आलेल्या अधिकारी वर्गासमोर ग्रामस्थानी मांडला समस्यांचा पाडा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेले कोकण रेल्वे चे जिल्ह्याचे पाहिले रेल्वे स्टेशन म्हणजे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन होय. मात्र सद्या हे रेल्वे स्टेशन विविध समस्यांच्या विळख्याने ग्रासलेले असून या स्टेशनला सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवासी वर्गाची अक्षरशः हालत होत आहे. याबाबत प्रवासी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबाबत लेखी पत्र व्यवहार करण्यात आला असून रेल्वे प्लॅटफॉर्म मंजूरी मिळाल्याचे समजते तरी देखील अधिकाऱ्यांचे उदासीनतेमुळे कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप व संताप आज खारेपाटण रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याकरिता आलेल्या कोकण रेल्वेचे अधिकाऱ्याकडे ग्रामस्थानी व्यक्त केला.
चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन च्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी दुपारी कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक अधिकारी श्री मधुकर मातोंडकर, वरिष्ठ खंड अभियंता श्री चिन्मय भंडारे, जी.पी प्रकाश (वरिष्ठ अधिकारी), विभगिय सुपरवायजर व्हीं डी सामंत खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला आले होते. यांच्या समवेत स्टेशन मास्टर श्री भूषण फाटक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थानी प्रवासी संघतेनेचे जिल्हा समिती सदस्य श्री संतोष राणे,सुरेश सावंत यांच्या समवेत खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म उंचिकरन करण्या बरोबरच विविध समस्येचा अधिकाऱ्या समोर पाडाच वाचला.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, माजी सरपंच इस्माईल मुकादम, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अनिल पेडणेकर, खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे सचिव श्री सूर्यकांत भालेकर, खारेपाटण रेल्वे स्टेशन समन्वय समिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश जामसंडेकर, सामजिक कार्यकर्ते श्री विजय देसाई, श्री संतोष पाटणकर, खारेपाटण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाद्यक्ष श्री संतोष तुरळकर, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, मोसम ग्रा.पं.सदस्य पांडुरंग कोकरे, अरुण कर्ले,बबन तेली, चींचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर,विवेक ब्रम्हदंडे, पन्हाळे येथील श्री चव्हाण आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण रेल्वे स्टेशन करीता आवश्यक बाबी
१) प्लॅटफॉर्म ची उंची वाढविणे.
२) तुतारी,कोकण कन्या व मांडवी एक्स्प्रेस आदी गाड्या थांबविणे.
३) स्टेशन कडे जाणारा रस्ता चांगला बनविणे
४)स्टेशन परिसरात पुरेशा लाईट ची व प्रवाशाना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे.
५.रेल्वे प्रवाशांना संगणक आरक्षण खिडकी उपलब्ध करून देणे
६) हॉलिडे स्पेशल गाडया खारेपाटण स्टेशनला थांबविणे
७) रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत रिक्षा स्टँड निर्माण करणे.
आदी प्रश्नांबाबत आज खारेपाटण रोड रेल्वे संघर्ष समिती तसेच खारेपाटण प्रवासी संघटना समन्वय समिती तसेच खारेपाटण ग्रामपंचायत व रिक्षा संघटना खारेपाटण यांच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आले.तर सदर कामे गणेश चतुर्थी पूर्वी पूर्णं करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर कामे वेळेत पूर्ण न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने प्रवासी समन्वय समितीच्या वतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,संघर्ष समितीचे सचिव श्री सूर्यकांत भालेकर व प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष श्री रमेश जामसंडेकर यांच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आला.