भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदी दिलीप तळेकर : नवीन कार्यकारिणीची करण्यात आली घोषणा

भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका (ग्रामीण) मंडल कार्यकारिणीची घोषणा शनिवारी दुपारी तळेरे येथे करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्षपदी पुन्हा दिलीप तळेकर यांची निवड करण्यात आली. याची घोषणा संदीप साटम यांच्या अध्यक्षतेखाली तळेरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तळेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संदीप साटम म्हणाले की, मागील 3 वर्षात लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीत उत्तम निकाल आणि अपेक्षित काम झालेले आहे. त्याबद्दल अभिनंदन करताना शत प्रतिशत भाजपकडे वाटचाल करून आपल्या या नवीन कार्यकारिणीत प्रत्येकाला सामावून घेण्याचा आणि जबाबदारी वाटून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर याव्यतिरिक्त अनेकांना अजून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील.
यावेळी खारेपाटण, कासार्डे, फोंडा, कलमठ या विभागाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : राजेश (सोनू) सावंत, राजेश जाधव, नरेश गुरव (उपाध्यक्ष) स्वरूपा विखाळे, विनिता बुचडे, तृप्ती माळवदे (महिला उपाध्यक्ष), गुरुप्रसाद (पंढरी) वायंगणकर, महेश गुरव (सरचिटणीस), सुधीर कुबल, भालचंद्र साटम, सूर्यकांत भालेकर, रवींद्र घाडीगावकर, गणेश पाताडे, विश्वनाथ जाधव (चिटणीस), सुजाता हळदिवे, निशा गुरव (महिला सरचिटणीस), संतोष कानडे (कोषाध्यक्ष), मंगेश कांबळे (एस सी मोर्चा), प्रवीण ठाकर (एस टी मोर्चा), हर्षदा वाळके (महिला मोर्चा), सदानंद चव्हाण (युवा मोर्चा), शंकर गुरव (किसान मोर्चा), इब्राहिम अली शेख (अल्पसंख्यांक मोर्चा), उदय बारस्कर (ओ बी सी मोर्चा) तर त्या त्या विभागातील काही कार्यकर्त्यांना सदस्य पदी निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी नवीन निवड झालेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन करताना साटम म्हणाले की, येणारा काळ निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपाध्यक्ष राजेश जाधव आणि सरचिटणीस गुरुप्रसाद वायंगणकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
यावेळी संदीप मेस्त्री, संजय देसाई, प्रदीप हरमलकर, सूर्यकांत भालेकर, हर्षदा वाळके आणि खारेपाटण, कासार्डे, फोंडा, कलमठ विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकार यांनी या विभागातील वीज समस्या, रस्ते, बसस्थानक समस्या असे विविध प्रश्न उपस्थित करून हे प्रश्नदेखील तातडीने सोडविण्याची मागणी केली.