राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवारी सकाळी ८.३० वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०८.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०९.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून इंडिगो (६ ई – ६०५७) विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ११.३० वा. जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल कु. पूर्वा रश्मी संदिप गावडे हिच्या सत्कार सोहळ्यास पत्रकार भवन सिंधुदुर्ग येथे उपस्थिती, दुपारी ०२.०० वा. अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती सायं. ०६.०० वा. मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण, रात्रौ ०८.०० वा. रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम
रविवारी २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता “केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत मिरकरवाडा मासेमारी बंदराचा विकास करणे” या कामाच्या भूमिपूजन समारंभास मा. पालकमंत्री, रत्नागिरी यांचे समवेत उपस्थिती, १०.३० वा. मोटारीने मिरकरवाडा बंदर, रत्नागिरीकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.