कलमठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा १५-२ ने पराभव
उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कलमठ ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच संदिप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. रिक्त उपसरपंच पदी आज भाजपचे दिनेश गोठणकर यांनी ठाकरे गटाचे धीरज मेस्त्री यांचा १५- २ ने पराभव केला. दिनेश गोठणकर यांना १५ तर विरोधात उभे असलेले धीरज मेस्त्री यांना फक्त २ मते मिळाली. दिनेश गोठणकर हे वॉर्ड क्रमांक एक मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले सदस्य होते. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर भाजपच्या वतीने अभिनंदन करत सत्कार केला. निवड जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष,कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, भाजपा शहर मंडल तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शक्तीकेंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर,विजय चिंदरकर, महेश लाड, गुरू वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य पपु यादव,अनुप वारंग,श्रेयस चिंदरकर,सचिन खोचरे,नितीन पवार,स्वाती नारकर ,सुप्रिया मेस्त्री, प्रीती मेस्त्री,नजराणा शेख,ईफत शेख,तनिष्का लोकरे,प्रियाली आचरेकर ,तेजस लोकरे, बूथ अध्यक्ष आबा कोरगावकर, परेश कांबळी, नाना गोठणकर, बाबू नारकर,संतोष रेवंडकर ,प्रवीण सावंत, शेखर पेंढरकर, महेश मेस्त्री, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, सागर पवार, जयराम चिंदरकर, बाळा चिंदरकर,संकेत वर्देकर, प्रवीण परब, परेश आचरेकर, आबी नांदगावकर, रामू वर्देकर,भाऊ चिंदरकर ,श्रेया वावळीये, नितेश चिंदरकर,समीर नांदगावकर,संदिप चिंदरकर, सागर चिंदरकर, श्रवण वावळीये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच संदिप मेस्त्री,ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी निवडणुकीचे काम पाहिले.