प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा

कातकरी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने संघटनेचा ६३ वा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. संघटनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता, संघटनेच्या कणकवली येथील नूतन कार्यालयात कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष श्री सुशांत मर्गज यांनी संघटनेच्या स्थापनेचा इतिहास, संघटनेने सदस्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष आणि संघटनेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान यावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीवर भर दिला.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती निकिता ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेने घेतलेल्या समाजाभिमुख उपक्रमांचे कौतुक करताना कणकवली शाखेचा उपक्रम “सामाजिक जाणीव ठेवणारा आणि प्रेरणादायी” असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास श्री. रुपेश गरुड (जिल्हा उपाध्यक्ष), श्री. धीरज हुंबे (जिल्हा कार्याध्यक्ष), श्री. संतोष कुडाळकर, श्री. अजय तांबे, श्री. किशोर गोसावी (विभागीय अध्यक्ष), श्री. संदीप गोसावी (सल्लागार), श्रीमती नेहा मोरे (विभागीय अध्यक्षा), श्री. ईश्वरलाल कदम (जिल्हा संघटक), श्रीमती विनिता शिरसाट (जिल्हा महिला संघटक), श्री. ऋतुजा जंगले- (पतपेढी उपाध्यक्ष),श्री. श्रीकृष्ण कांबळी -(पतपेढी संचालक),श्री. टोनी म्हापसेकर (तालुका शिक्षक नेते) आणि बहुसंख्या समिती पाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती नेहा मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अजय तांबे यांनी मानले.