नापणे धबधब्या ला “शेर्पे -नापणे धबधबा” असे नाव दया…..

शेर्पे ग्रामपंचायत व ग्रामस्थांची मागणी
नापणे धबधब्या ला “शेर्पे -नापणे धबधबा” असे नाव दया अशी शेर्पे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मागणी केली असून त्यांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात असे म्हंटले आहे की, “शेर्पे नापणे धबधबा “हा फक्त “नापणे धबधबा” नसून पूर्वीपासून त्याला “शेर्पे-नापणे धबधबा” असेच नाव देण्यात आले आहे. कारण हा धबधबा शेर्पे ग्रा. पं. कार्यक्षेत्र हद्दीत आहे. धबधब्या चा मार्ग, आजूबाजूची जमीन, व स्थानिक बांधकामे ही सर्व शेर्पे ग्रामपंचातीच्या हद्दीत येतात. धबधब्या कडे जाणारे रस्ते/मार्ग हे देखील शेर्पे ग्रा. पं. कार्यक्षेत्र च्या हद्दीतून जातात. धबधब्या कडे येणाऱ्या पर्यटकांना शेर्पे ग्रा. पं. कार्यक्षेत्र च्या हद्दीतून ये-जा करावी लागते. तेथील इमारतीवरील कर, हॉटेल कर व इतर कर हे सर्व कर ग्रामपंचाय शेर्पे कडे भरले जातात. परंतु शासनामार्फत अलीकडेच या धबधब्या वर काचेचा पूल उभारण्यात आलेला असून सदर “काच पूलास शेर्पे नापणे धबधबा असे नाव न देता फक्त “नापणे धबधबा ” असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये “शेर्पे ” गावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.वरील सर्व बाबी विचारात घेता, हा धबधबा शेर्पे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येतो. तरी शासनाच्या दफ्तरी सदर धबधब्या चे नावात “शेर्पे धबधबा “असा बदल करण्याची आपली सकारात्मक कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती अश्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत शेर्पे मार्फत करण्यात आले आहे.हे निवेदनमहाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. पांचाळ यांनी दिली.