पालकमंत्री मा श्री.नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते होणार”मुख्यमंत्री चषक-2025″ भजन स्पर्धेचे उद्घाटन- संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांची माहिती.

कणकवली/मयूर ठाकूर
नव्यानेच उदयास आलेल्या भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले असून या उपक्रमांची सुरुवात श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील सहभागापासून झाली.सध्या संस्थेच्या वतीने तालुका बैठकांच आयोजन करण्यात आलेलं असून या तालुका बैठका यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. देवगड-वैभववाडी-कुडाळ-मालवण येथे झालेल्या तालुका बैठकांना भजनी कलाकारांची मोठी गर्दी पहायला मिळाली.भजनी कलाकारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेची ध्येय-धोरणे आणि उद्दिष्टे भजनी कलाकारांना भावली असून या संस्थेच्या उपक्रमांनी विशेष नावीन्यता प्राप्त केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग पुरस्कृत आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आयोजित कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय भव्य “मुख्यमंत्री चषक 2025″या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री माननीय श्री नितेश राणे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.या संदर्भातली माहिती भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी दिली आहे
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या भजन मंडळाला 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या भजन मंडळास 11 हजार रुपये ,तृतीय क्रमांकाच्या भजन मंडळास 9000 रुपये असे बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. उत्तेजनार्थ प्रथम भजन मंडळास 5000 रुपये आणि उत्तेजनार्थ द्वितीय भजन मंडळास द्वितीय 4000 रुपये असे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.त्याशिवाय उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट झांज वादक यांना प्रत्येकी 1 हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.विजेत्या संघन्ना आकर्षक चषके दिली जाणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकार,भजन रसिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे संस्था अध्यक्ष संतोष कानडे बुवा यांनी केले.





