आचरा येथे कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग तपासणी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शिबिराचा झाला शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर
कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनातील भीती कमी व्हावी ,लोकांना कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे ओळखता यावी
आदी उद्देशाने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आयोजित कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उप जिल्हाप्रमुख महेश राणे ,युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर,तालुका प्रमुख बाईत,दिपक पाटकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, डॉ प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, अभिजित सावंत, बाबू कदम, गुरु कांबळी,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, चंदू कदम,यांसह
तालुका आरोग्य अधिकारी सुधीर धणगे, डॉ स्वप्नील बोदमवाड,
डॉ समिर धाकोटकर, डॉ पद्मजा कुंभारवाड,आचरा आरोग्य अधिकारी डॉ जुवेरीया मुजावर यांसह अन्य आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते
या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मार्फत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील रुग्णांची कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टर मार्फत
तपासणी करण्यात आली.
कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन एक महिना कालावधीमध्ये जिल्हामधील जिल्हा, उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयीत लाभार्थ्यांची तपासणी करणार आहे.

error: Content is protected !!