भालचंद्र मित्रमंडळाची पालखी पदयात्रा

कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा

गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र मित्रमंडळाने कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा शुभारंभ बुधवारी सकाळी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात झाला. यावेळी साई भक्तांनी ओम साई राम चा जयघोष केला. त्यानंतर पदयात्रा कविल गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली.
पदयात्रेत सचिन कुवळेकर, आशुतोष ठाकूर, सचिन टोणेमारे,सत्यवान कुबल, शेखर गणपत्ये, मिथून मिठारी, मितेश मिठारी, दक्षेश ठाकूर ,काव्याशं ठाकूर, रुपेश पेडणेकर, सदानंद पारकर, नितीन कुवळेकर, सिद्धेश ठाकूर, स्वप्नील ठाकूर,सुनिल नेर्ले, रामचंद्र बाणे, पांडुरंग लाड, गुरु कामतेकर, मनोज कोदे,सिकंदर मेस्त्री, भारती कोदे, शैलेजा सावंत, माधवी परब, तेजश्री परब, आरोही ठाकूर,मृणाली मिठारी, तृप्ती ठाकूर, विजया ठाकूर यांच्यासह साई भक्त सहभागी झाले आहेत. दुपारी ओरोस येथील भवानी मंदिर येथे पालखी पदयात्रेने विसावा घेतला. रात्री कविलगाव येथे मुक्काम केला.  गुरुवारी १० जुलै रोजी सकाळी साई भक्त मंदिरात पूजा-अर्चा व अभिषेक करणार आहेत. त्यानंतर गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतील. दुपारी महाप्रसाद घेतल्यानंतर पुन्हा साईंची पालखी पदयात्रेचे कविलगाव येथून कणकवलीकडे प्रस्थान होईल. गेली १६ वर्षे गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र मित्रमंडळ ही पालखी पदयात्रा काढत आहे.

error: Content is protected !!