सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी पिसेकामते गावच्या नयोमी साटम यांची नियुक्ती

या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन

मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते फळसेवाडी येथील नयोमी दशरथ साटम यांची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. नयोमी यांचे कुटुंबीय मुंबई येथे स्थायिक आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून 2019 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते. पदवीधर होत त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला. त्यावेळी कोरोनामुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली त्या परीक्षेत त्या 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!