बिडवाडी दत्तमंदिर येथे उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

बिडवाडी येथील श्री गुरुदेव दत्तमंदिर येथे गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी 7 वा. श्रींची महापूजा, 9वा. अभिषेक सेवा, दु. 1 वा. आरती व त्यानंतर महाप्रसाद, सायं. 4 ते 7 वा. श्रींच्या चरणावर विविध सूक्त अभिषेक सेवा, सायं. 7 ते 7.30 वा. नामस्मरण सेवा, सायं. 7.30वा. आरती व त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव दत्तमंदिर उत्सव कमिटी, बिडवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!