सिंधुदुर्गात भात पिकाची वेगळी जात निर्माण करून आपण वेगळे वैशिष्ट्य जपले पाहिजे

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे प्रतिपादन
तळेरे येथे जिल्हास्तरीय कृषी दिनाचे आयोजन
जिल्ह्यात भात पीकाची वेगळी जात निर्माण करून तीला जी आय मानांकन देऊन एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले पाहिजे. त्याचबरोबर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे आधुनिक तंत्र आपण अंगिकारले पाहिजे. यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत गेले पाहीजे. शेतकरी तुमच्याकडे येईल अशी अपेक्षा ठेऊ नये. प्रगतीशील शेतकऱ्यांकडून त्यांनी उत्पादन कसे वाढविले याची माहिती घेऊन अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यानी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, पंचा पंचायत समिती कणकवली व ग्रामपंचायत तळेरे याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तळेरे येथील कृषी दिन शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी अनिल पाटील पाच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विकास अधिकारी दिक्षांत कोळप, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी अरुण वालावलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी जाधव, तज्ज्ञ मार्गदर्शक कृषी संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ. विजयकुमार शेटये, उद्यानविदया महाविद्यालय मुळदे सहा. प्राध्यापक डॉ. आशुतोष पवार,मंगेश वालावलकर, जिल्हातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारीवर्गासह शेतकरी व नागरीक उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर म्हणाले, शेतकऱ्याला मोठे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांचे महत्त्व फार मोठे असते. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील एक शेतकऱ्याला योजनाचा लाभ देऊन पुढे आणल्यास एक कुटुंब पुढे आणल्याचे समाधान आपल्याला मिळेल असे काम करावे, असे सांगत कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कृषी दिन हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने दिवस असल्याने आजच्या कृषी दिनानिमित्त खास तळेरेतील प्रगतीशील शेतकरी उदय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून भोजनाचा मेनू पारंपरिक कोकणी पध्दतीने केळीच्या पानावर डाळ, भात, भाजीसह तीळकूट, अळू, झुणका, नाचणीची भाकरी असा बेत केला होता. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उपस्थितांनी याचा आस्वाद घेतला.प्रगतीशील शेतकरी सुनील तावंत (वरवडे,) भास्कर सावंत (वरवडे,), स्नेहल कदम (तरंदळे), उदय पाटील (तळेरे) रामचंद्र धनदाडे याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळेस तळेरे विठ्ठल मंदिर परीसरात वृक्षारोपण, उदय पाटील याच्या शेतीत श्री पध्दतीने भात
लागवड, बांधावर झाडांची लागवड प्रात्यक्षिक, कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्यांची कृषी विषयक प्रात्यक्षिके, ड्रोनव्दारे कीटकनाशके फवारणी याची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषी अधिकारी याणी पाहणी करत विशेष कौतुक केल.
 
	




