दारिस्ते येथील पूर्ण प्रार्थमिक शाळा दारिस्ते नं १ व शाळा नं ३ मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आले वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दारिस्ते येथील पूर्ण प्रार्थमिक शाळा दारिस्ते नं १ व शाळा नं ३ मधील विद्यार्थ्यांना भाजपचे उपाध्यक्ष गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आल्या. त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, विजय भोगटे,दारिस्ते सरपंच सानिका गांवकर उपसरपंच संजय सावंत,सागवे माजी सरपंच मयूरी मुंज, चेअरमन बाबी साळसकर,नेहा सावंत,नंदू सावंत, सोन्या सावंत तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना पुढील वाटचालीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.